‘कचरा’ हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून, त्याकडे आपल्याला स्रोत म्हणून पाहावयाचे आहे. समाजमनातील विचारांमध्ये हा बदल होणे, ही काळाची गरज आहे!
प्रत्येक सुजाण नागरिकाने आपल्या गावातील डम्पिंगक्षेत्रावर कुटुंबीयांसह जावे अशी माझी आग्रहाची विनंती आहे व तिथली स्थिती स्वतःच्या डोळ्यांनी बघावी, म्हणजे आपण कचऱ्याचा केवढा भयानक प्रश्न निर्माण केला आहे, हे त्यांच्या लक्षात येईल! त्या समस्येची उकल आपल्याच हाती आहे, असेही मग लक्षात येईल. असे झाले तरच आपण या नरकपुऱ्या नष्ट करू शकू!.......